भोपाळ - काँग्रेसचे कमलनाथ समर्थक आमदार थोड्याच वेळात राजस्थानला जाण्यासाठी निघणार आहेत. विशेष विमानाने सर्वजण जयपूरला निघाले आहेत. राजाभोज विमानतळावर सर्वजण आत्ता पोहचले असून थोड्याच वेळात ते जयपूरला रवाना होणार आहेत. सर्व आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना देण्यात आली आहे.
मध्यप्रदेश सत्तापेच: काँग्रेस आमदार जयपुरात, ब्यूना रिसॉर्टमधील ५० खोल्या 'बुक'
ब्यूना रिसॉर्टमध्ये काँग्रेस आमदार थांबणार आहेत. या रिसॉर्टमधील ५० खोल्या आमदारांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
ब्यूना रिसॉर्ट
जयपूरमधील ब्यूना रिसॉर्टमध्ये काँग्रेस आमदार थांबणार आहेत. या रिसॉर्टमधील ५० खोल्या आमदारांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. भाजपने आपल्या १०६ आमदारांना आधी दिल्लीला हलविले होते. तेथून त्यांना आता हरियाणातील गुरगावला हलविण्यात आले आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत २२ आमदारांनी आमदारांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे, मात्र, आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करू असा दावा काँग्रेसने केला आहे.
Last Updated : Mar 11, 2020, 11:55 AM IST