महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपप्रवेश केला म्हणून मुस्लीम महिलेला भाड्याचे घर खाली करण्यास सांगितले - bjp

'मी काल भाजपमध्ये प्रवेश केला. जेव्हा माझ्या घरमालकिणीला ही बाब माहिती झाली, तेव्हा तिने मला चुकीची वागणूक देण्यास सुरुवात केली. तसेच, मला ताबडतोब घर खाली करण्यास सांगितले,' अशी माहिती गुलिस्ताना यांनी दिली.

मुस्लीम महिला गुलिस्ताना

By

Published : Jul 8, 2019, 9:20 AM IST

अलीगढ - उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील मुस्लीम महिलेने भाड्याचे घर खाली करण्यास सांगितल्यावरून पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून घरमालकिणीने भाड्याचे घर खाली करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे. गुलिस्ताना असे या महिलेचे नाव आहे.

'मी काल भाजपमध्ये प्रवेश केला. जेव्हा माझ्या घरमालकिणीला ही बाब माहीत झाली, तेव्हा तिने मला चुकीची वागणूक देण्यास सुरुवात केली. तसेच, मला ताबडतोब घर सोडण्यास सांगितले,' अशी माहिती गुलिस्ताना यांनी दिली.

पोलिसांनी घटनेविषयी तक्रार नोंदवून घेतली आहे. 'प्रथमदर्शनी यामध्ये घरमालकाच्या आईने विजेचे बिल भरण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केल्याचे समजले आहे. त्यानंतर त्यांनी एका राजकीय पक्षात प्रवेश केल्यावरूनही जोरदार वादावादी झाल्याचे समजते. याप्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे,' अशी माहिती अलीगढचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आकाश कुल्हारी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details