काश्मीरमधील मुस्लिमाची काळजी पण चीनमधल्या मुस्लिमांचं काय?, अमेरिकेचा पाकिस्तानला प्रश्न
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये अमेरिकेनं पाकिसत्नाच्या दुटप्पी वागण्यावर प्रकाश टाकाला आहे.
नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये अमेरिकेनं पाकिसत्नाच्या दुटप्पी वागण्यावर प्रकाश टाकाला आहे. पाकिस्तानला काश्मीरमधील मुस्लिमांविषयी जितकी चिंता आहे. तितकीच चिंता चीनमध्ये नजरकैदेत असलेल्या मुस्लिमांविषयी का नाही, असा प्रश्न अमेरिकेने पाकिस्तानला विचारला आहे.
चीनमध्ये झिंजियांग प्रांतात 10 लाख विगर मुस्लिमांना बंदी बनवण्यात आले आहे. तिथला मुस्लीम समुदाय भीषण स्थितीत राहतो आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनबद्दल का बोलत नाहीत. चीनमध्ये सर्वांत जास्त मानवी हक्काचे उल्लघंन होत असून इम्रान खान यांना तिथल्या मुस्लिमांची चिंता नाही का? , असा सवाल अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाच्या सचिव अॅलिस वेल्स यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये उपस्थित केला.
चीनने झिजियांग प्रांतामध्ये या अल्पसंख्याक विगर मुस्लीम बंदिवासात ठेवण्यात आले आहे. सुमारे 1 दशलक्ष उईगर आणि इतर मुस्लिमांना नजरकैदेत ठेवले गेले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चीन या शिबिरांना प्रशिक्षण शिबिरे म्हणून संबोधत असून या शिबिराच्या माध्यमातून ते कट्टरता निर्मूलनाबरोबरच लोकांची कौशल्ये वाढवत असल्याचे सांगत आहे.