महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तेलंगणामध्ये संततधार पाऊस ; मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा - पोलीस महासंचालक महेंद्र रेड्डी

पावसामुळे राज्यातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

तेलंगणा
तेलंगणा

By

Published : Aug 16, 2020, 7:43 AM IST

हैदराबाद - तेलंगणामध्ये संततधार पाऊस पडत आहे. पावसामुळे राज्यातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

राज्यात सुरू असेलेल्या पावसामुळे शनिवारी कित्येक नाले व कालवे ओसंडून वाहू लागले आहेत. संततधार पावसामुळे वारंगळ शहरातील काही भाग पाण्याखाली गेले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. बाधित भागातील लोकांना मदत शिबिरात हलवण्यात येत आहे.

दरम्यान, जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यात भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) हेलिकॉप्टरने 14 शेतकर्‍यांना वाचवले आहे. हे शेतकरी कुंदनपल्ली गावातील आपल्या शेतात अडकले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्य सचिव सोमेश कुमार, पोलीस महासंचालक महेंद्र रेड्डी आणि मंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना हैदराबादमध्ये दोन नियंत्रण कक्ष सुरू करण्यास सांगितले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) रविवारी जे. भूपाळपल्ली, मुलुगु, वारंगळ, करीमनगर, पेडापल्ली, मंचेरियल जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details