रांची -झारखंड पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अल कायदा या संघटनेचा दहशतवादी मोहम्मद कालिमुद्दीन मुजाहिरी याला अटक केली आहे. कालिमुद्दीन हा अल कायदाचा एक मुख्य दहशतवादी आहे. त्याला टाटानगर रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे.
कालिमुद्दीनवर भारतासह उपखंडातील तरुणांना जिहादसाठी तयार करणे आणि हिंसेसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. होते. तो नव्याने प्रवृत्त केलेल्या तरूणांना पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठवत होता, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक एम.एल. मीना यांनी रविवारी पत्रकारांना दिली. मशेदपूर येथील रहिवासी असलेला कलिमुद्दीन हे गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. त्याच्याविरोधात जमशेदपूर येथे भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली अनेक गुन्हे दाखल आहेत.