महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आकाश विजयवर्गीय यांची तुरुंगातून सुटका; म्हणाले - 'मला मारहाण केल्याची खंत नाही' - BJP MLA

पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांना अटक करण्यात आली होती. त्यांची आज जेलमधून सुटका करण्यात आली आहे.

आकाश विजयवर्गीय

By

Published : Jun 30, 2019, 10:25 AM IST

इंदूर - पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांना अटक करण्यात आली होती. त्यांची आज जेलमधून सुटका करण्यात आली. आकाश हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आहेत.


'पालिका अधिकाऱ्याचं अतिक्रमण विरोधी पथक एका महिलेला ओढत घराबाहेर काढत होते. म्हणून मी मारहाण केली. मी जे काही केले याची मला बिलकूल खंत नाही. या अधिकाऱ्यांनी मला पुन्हा कधी फलंदाजी कारायला लावू नाही, अशी मी देवाकडे पार्थना करतो', असे विजय यांनी म्हटले आहे.


इंदूर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून बुधवारी सकाळी कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असतानाच वाद झाला आणि आमदार आकाश विजयवर्गीय तिथे दाखल झाले. किरकोळ बाचाबाची झाल्यानंतर आकाश यांनी हातात बॅट घेऊन पालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला केला.


पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने या अधिकाऱ्याची सुटका झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आकाश यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करुन आकाश यांना अटक करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details