बंगळुरू -भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांचा भाजपला आगामी निवडणुकीत फायदा होईल, असे वक्तव्य कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस. येदियुरप्पा यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर येदियुरप्पा यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे.
'हवाई हल्ल्याचा भाजपला फायदा, कर्नाटकात आम्ही २२ जागा जिंकू' - Loksabha Elections
आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे येदियुरप्पा यांनी म्हटले आहे. आपण वेगळ्या संदर्भात हे वक्तव्य केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या हल्ल्यामुळे भाजप आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकात २२ हून अधिक जागांवर विजय मिळवेल, असेही येदियुरप्पा यांनी म्हटले आहे. मोदी सरकारमुळे आपल्या ४० जवानांचा बदला घेता आला. तसेच तरूणांमध्ये मोदी लाट असल्याचेही ते म्हणाले. हवाई हल्ला करून मोदींनी आपले वचन पाळले असल्याचेही ते म्हणाले.
आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे येदियुरप्पा यांनी म्हटले आहे. आपण वेगळ्या संदर्भात हे वक्तव्य केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील स्थिती भाजपसाठी पूरक असल्याचे म्हणत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.