नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती अत्यंत वाईट असून गुरुवारी सकाळी दिल्लीतील बर्याच भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 400 पीएमच्या वर गेला होता. ज्या लोकांना श्वसनाचा त्रास आहे, अशा लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात सरकारतर्फे देण्यात आला आहे.
दिल्लीतील प्रदूषणाची अत्यंत वाईट स्थिती; हवेचा गुणवत्ता निर्देशांक 400 पार - दिल्ली हवामान बातमी
राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती अत्यंत वाईट असून गुरुवारी सकाळी दिल्लीतील बर्याच भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 400 पीएमच्या वर गेला होता.
दिल्लीतील प्रदूषणाची अत्यंत वाईट स्थिती; हवेचा गुणवत्ता निर्देशांक 400 पार
गुरुवारी सकाळी 6 वाजता दिल्लीतील आनंद विहार भागात एअर क्वालिटी इंडेक्स 416 , मुंडका भागात 405, द्वारका मध्ये 400, नरेला मध्ये 402, दिल्ली विद्यापीठात 379, ओखला 374 आणि पूसा भागात 363 पीएम नोंदविण्यात आला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 30 ऑक्टोबरपासून वाऱयांचा वेगात थोडा सुधार होऊन तो तीव्र होईल, असे झाल्यास दिल्लीतील लोकांना प्रदूषणाच्या वाढत्या पातळीपासून दिलासा मिळेल.