नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमधील हवा प्रदुषण पुन्हा एकदा झपाट्याने वाढायला सुरूवात झाली आहे. आज (बुधवारी) दिल्लीतील एअर क्लालिटी इंडेक्स (एआयक्यु) म्हणजेच हवेचा निर्देशांक ४५७ अंकावर पोहचला आहे. मागील आठवड्य़ात प्रदुषणापासून थोडी उसंत मिळाल्यानंतर दिल्लीकर पुन्हा एकदा प्रदुषणाच्या विळख्यात अडकले आहेत.
दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशामध्ये सतत प्रदुषण वाढत असताना मागील आठवड्यामध्ये प्रदुषण कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा पाऊस आणि दमट हवामानामुळे हवेचा स्तर बिघडण्यास सुरुवात झाली. आज(बुधवारी) सकाळी अनेक परिसरांमध्ये हवेचा स्तर ४०० पेक्षा जास्त होता.
दिल्लीतील लोधी रोडवरील हवा प्रदुषण सर्वात जास्त असून तेथील हवेचा निर्देशांक ५०० पर्यंत पोहचला आहे.