नवी दिल्ली - एअर इंडियाच्या पायलटने ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावरील एका दुकानामध्ये सामान चोरी केल्याचा प्रकार समोर आला होता. यावर कारवाई करत एअर इंडियाने त्याला निलंबित केले आहे. रोहित भसीन असे एअर इंडियाच्या पायलटचे नाव आहे.
विमानतळावर चोरी करणारा एअर इंडियाचा 'तो' पायलट निलंबित - shoplifting
एअर इंडियाच्या पायलटने ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावरील एका दुकानामध्ये सामान चोरी केल्याचा प्रकार समोर आला होता. यावर कारवाई करत एअर इंडियाने त्याला निलंबित केले आहे. रोहित भसीन असे एअर इंडियाच्या पायलटचे नाव आहे.
रोहीत भसीनला एआय 301 विमानाचे पायलट म्हणून तैनात केले होते. 22 जून, 2019 ला ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावरील रोहीतने एका करमुक्त दुकानातून वॉलेट चोरी केले होते. यासंबधीत माहिती एअर इंडिया कंपनीला मिळाली. त्यानंतर कंपनीकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
एअर इंडिया कंपनी झीरो टॉलरेंस पॉलिसीवर काम करते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येते, अशी माहिती एअर इंडियाचे प्रवक्ते धंनजय कुमार यांनी दिली आहे.