नवी दिल्ली -चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान आज रवाना होणार आहेत. ४२३ आसनक्षमता असणारे 'जम्बो बी ७४७' हे विमान दिल्लीहून निघून चीनच्या वुहान शहरात उतरेल, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर, आज एअर इंडियाचे विमान आज दुपारी १२.३० वाजता चीनला रवाना होणार आहे. मुंबईहून आज सकाळीच हे विमान दिल्लीला पोहोचले आहे. आज दुपारी निघालेले हे विमान उद्या पहाटे दोनच्या दरम्यान भारतात परत येईल. यावेळी कमीत कमी ४०० नागरिकांना परत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या विमानात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह पाच डॉक्टरांचे एक विशेष पथकदेखील असणार आहे.