नवी दिल्ली - कोरोनाबाबतच्या सर्व तक्रारींचे अथवा समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी एअर इंडिया कोविड-सेलची स्थापना करणार आहे. कंपनीचे चेअरमन राजीव बन्सल यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली.
२५ मेपासून देशातील प्रवासी विमानसेवा पूर्ववत झाली आहे. "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, विमानसेवेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व प्रादेशिक संचालकांनी एक पूर्ववेळ काम करणाऱ्या कक्षाची स्थापना करावी. हा कक्ष कोरोनासंबंधी सर्व तक्रारींकडे लक्ष ठेवेल. या कक्षामध्ये अभियांत्रिकी, विमानांतर्गत सेवा, वैयक्तिक विभाग आणि वैद्यकीय सेवा यांमधील प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेले एक पथक असेल." अशी सूचना बन्सल यांनी एअर इंडियाच्या सर्व प्रादेशिक संचालकांना दिली.