पाटणा -बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन झाले. आज नव्या आमदारांनी शपथग्रहण केली. यावेळी शपथपत्रात लिहिलेला ‘हिंदुस्थान’ शब्द उच्चारण्यास एआयएमआयएमचे आमदार अख्तरुल इमान यांनी नकार दिला. त्यावरून भाजपाने टीका केली. त्यांना हिंदुस्थान पंसत नाही. तर त्यांनी पाकिस्तानात जावे, असे भाजपाचे आमदार प्रमोद कुमार यांनी म्हटलं.
भाजपाचे आमदार प्रमोद कुमार यांची अख्तरुल इमान यांच्यावर टीका उर्दूमध्ये शपथपत्र मिळाले असून त्यामध्ये भारताऐवजी हिंदुस्थान असा उल्लेख आहे. हिंदी आणि मैथली भाषेत असलेल्या शपथपत्रात भारत असा उल्लेख केला आहे. मात्र, उर्दू भाषेतील पत्रात हिंदुस्थान लिहले आहे. संविधानमध्ये भारताचे लोक असा उल्लेख असल्यामुळे मला भारत असा शब्द उच्चारण्यास परवानगी द्यावी, असे अख्तरुल इमान यांनी विधानसभा अध्यक्षांना परवानगी मागितली. त्यानंतर त्यांनी भारत असा उच्चार करत शपथ ग्रहण केली.
एआयएमआयएमचे आमदार अख्तरुल इमान यांचा शपथविधी भारत कोणाच्या बापाचा नाही -
हिंदुस्थान असा उच्चार न केल्यामुळे पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला भाजपने दिल्यावर, भारत कोणाच्या बापाचा नाही, अशी प्रतिक्रिया अख्तरुल इमान यांनी दिली. बिहार विधानसभेत एआयएमआयएमचे पाच आमदार निवडून आले आहेत. एआयएमआयएममुळे महाआघाडीला मोठा फटका बसला. पाच जागा मिळाल्याने आता यशामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा उत्साह वाढला आहे. पश्चिम बंगालमध्ये होणाऱया विधासनसभा निवडणुकांमध्येही ओवेसी आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत.
अख्तरुल इमान म्हणाले भाजप फक्त द्वेष पसरवतयं कोणाला किती जागा -
तीन टप्प्यांत झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा 10 नोव्हेंबरला निकाल समोर आला. 243 मतदारसंघासाठी झालेल्या या निवडणुकीत एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 125 जागा मिळाल्या आहेत. तर यूपीएला 110 जागांवर समाधान मानावे लागले. एनडीएत भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर जनता दल (यू) 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा (सेक्युलर) आणि विकासशील इन्सान पार्टीने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने 110 जागांवर विजय मिळवला.