महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आत्मनिर्भर! तेलंगाणामधील आदिवासी जमातीने घनदाट जंगलातून तयार केला 8 किमीचा रस्ता - डोंगर फोडून रस्ता

तेलंगणा राज्यातील चेनचू जमातीच्या सदस्यांनी घनदाट जंगल आणि डोंगरातून मार्ग काढत रस्ता तयार केला आहे.

तेलंगणा
तेलंगणा

By

Published : Sep 4, 2020, 5:04 PM IST

हैदराबाद - तेलंगाणा राज्यातील चेनचू जमातीच्या सदस्यांनी घनदाट जंगल आणि डोंगरातून मार्ग काढत रस्ता तयार केला आहे. एका आदिवासी सहाय्य संस्थेच्या मदतीने आठ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे.

तेलंगणामधील अदिवासी जमातीने घनदाट जंगलातून तयार केला 8 किमीचा रस्ता

नगरकर्णूल जिल्ह्यातील चेनचू जमातीच्या 33 कुटुंबांना आपल्या गरजेच्या वस्तू आणण्यासाठी जीव धोक्यात घालून जंगलातून जावे लागत होते. रस्ता तयार करुन द्यावा, अशी मागणी त्यांनी सरकारला केली होती. मात्र, सरकारकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. अखेर शासनाच्या मदतीची वाट न पाहता एकात्मिक आदिवासी विकास एजन्सीच्या (आयटीडीए) मदतीने चक्क डोंगर फोडत 8 किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे.

आयटीडीएने जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या दुर्गम खेड्यांना जोडणारा 19 किलोमीटरचा रस्ता मंजूर केला असून आदिवासी लोक ‘आत्मनिर्भर अभियान’ अंतर्गत रस्ता तयार करण्याचे काम करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details