मुंबई -इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, दक्षिण कोरिया आणि श्रीलंकेला जाणारी विमाने एअर इंडियाने रद्द केली आहेत. कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी एअर इंडियाने चीन, कुवैत अशा देशांमधील विमानसेवा बंद केल्या आहेत.
३० एप्रिलपर्यंत ही बंदी राहणार असल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.
यासोबतच, इटलीच्या मिलान शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान जाणार आहे. शनिवारी दुपारी हे विमान भारतातून रवाना होईल, तर रविवारी दुपारी ते दिल्लीमध्ये परतणार आहे. नागरी-उड्डाण मंत्रालयाच्या सह-सचिव रुबीना अली यांनी ही माहिती दिली. इटलीमधील मिलान शहरामध्ये आणि परिसरात जवळपास २२० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत.
हेही वाचा :नजरकैदेतून सुटल्यानंतर फारुक अब्दुलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...