महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ट्रम्प भारत दौरा : द्विपक्षीय व्यापारी करार होणार? - India-USA friendship

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारताने तयारी सुरू केली आहे. ट्रम्प यांचा भारतातील दोन दिवसीय दौरा 24 फेब्रुवारीला सुरू होत आहे. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील व्यूहात्मक संबंध अधिक बळकट होणार आहेत. यावेळी अवकाश, संरक्षण आणि व्यापार क्षेत्रासह अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपुर्ण द्विपक्षीय करार पार पाडण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, देशाच्या विविध भागात काही मुद्द्यांवर चर्चा होत आहे.

ट्रम्प भारत दौरा
ट्रम्प भारत दौरा

By

Published : Feb 16, 2020, 3:16 PM IST

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांदरम्यान संभाव्य व्यापारी करारांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर योग्य पद्धतीने करार झाला तर आपल्या आगामी दौऱ्यात भारताबरोबर व्यापारी करार करण्यात येण्याची शक्यता आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले होते. दोन्ही देशांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत.

भारताला स्टील आणि अॅल्युमिनिअम उत्पादनांवरील उच्च शुल्कात सवलत हवी आहे आणि सामान्यीकृत प्राधान्यक्रम यंत्रणेद्वारे(जीएसपी) प्राधान्य दर प्रणाली पुर्ववत करण्याची मागणी भारताकडून केली जात आहे. कृषी, वाहन आणि अभियांत्रिकी उत्पादनांचा विपणन वाटा वाढविण्याबाबत भारताने हट्टी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, माहिती आणि संवाद तंत्रज्ञान(आयसीटी) उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी अमेरिका करीत आहे. त्याचप्रमाणे, त्यांच्या दुग्ध उत्पादने आणि वैद्यकीय उपकरणांना बाजारपेठेत अधिक प्रमाणात प्रतिनिधीत्व देण्याची अमेरिकेची मागणी आहे.

काही दिवसांपुर्वी, अमेरिकेच्या संबंधित विभागाने भारत सरकारला इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टमच्या (आयएडीडब्लूएस) संभाव्य विक्रीस मंजुरी दिली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान या 186 कोटी डॉलरच्या करारावर स्वाक्षरी होण्याचा अंदाज आहे. अमेरिकी कंपनी लॉकहीड मार्टिनकडून 24 बहुपयोगीएमएच 60 रोमिओ सीहॉक हेलिकॉप्टर्सची खरेदी करण्याचा करारदेखील अंतिम टप्प्यात येण्याची शक्यता आहे. या कराराचे मूल्य आहे 260 कोटी डॉलर. आणखी एक अमेरिकी कंपनी बोईंगची आपली एफ-15 ईएक्स ईगल विमाने भारतीय हवाईदलाला विकण्याची योजना आहे. यासाठी निर्यात परवाना मंजुर करण्याची मागणी कंपनीने अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान, या करारासंदर्भातदेखील चर्चा होण्याचा अंदाज आहे.जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त करुन देणाऱ्या कलम 370 ची मान्यता रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाला अमेरिकी काँग्रेसच्या काही घटकांकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. यासंदर्भात, त्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. मात्र, भारताच्या निर्णयास आपले समर्थन आहे असे ट्रम्प यांनी आगामी दौऱ्याद्वारे स्पष्ट केले आहे, असे मत राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे.

काश्मीर प्रश्नाबाबत आपण भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी करण्यास तयार आहोत, अशीही घोषणा ट्रम्प यांनी यापुर्वी केली होती. मात्र, हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे भारताने स्पष्ट केल्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केला नव्हता. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुका जवळ आल्या आहेत. ट्रम्प यंदाही राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. या दौऱ्याद्वारे ट्रम्प भारतीय अमेरिकी नागरिकांची मते मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे विश्लेषकांचे मत आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान आशियाई राजकारणाबाबतदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details