लखनऊ-कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांवर अनिश्चिततेचे सावट आहे. याचा परिणाम भारताचा तिरंगा झेंडा उत्पादित करणाऱ्या खादी ग्रामोद्योग वर झाला आहे. शाळा, महाविद्यालय आणि खासगी संस्था बंद असल्यामुळे तिरंगा ध्वजाची मागणी थंडावली आहे.
स्वातंत्र्यदिन काही दिवसांवर आलेला असताना कोरोनामुळे तिरंगी झेंड्याची मागणी घटली
दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा झेंडा विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मात्र, यावर्षी अजिबात मागणी नाही, अपवाद फक्त शासकीय कार्यालयांनी ध्वज खरेदी केले आहेत.
दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा झेंडा विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मात्र, यावर्षी अजिबात मागणी नाही अपवाद फक्त शासकीय कार्यालयानी ध्वज खरेदी केले आहेत. सर्वजण वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे त्यांना ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला बोलावले जाणार नाही, असे खादी ग्रामोद्योग आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनाच्या काळात तिरंगा झेंड्याची 70 टक्के विक्री शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांना केली जाते. मात्र, यावर्षी त्यांच्याकडून फार थोड्या प्रमाणात मागणी करण्यात आली आहे. यावर्षी 90 टक्के व्यवसाय थंडावला असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. खादी ग्रामोद्योग कडील तिरंगा झेंड्याची विक्री कमी झाल्याचे, कारण ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म ॲमेझॉन यांनाही कारणीभूत मानले जाते. लोक बाजारात न जाता तिरंगा झेंडा उपलब्ध होत असल्यामुळे ऑनलाइन शॉपिंग साइट्स वरून तो खरेदी करत असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
लहान आकाराचे सिंथेटिक झेंडे बनवणारे देखील आमचा व्यवसाय मारत असल्याचे मीरत येथील भूपिंदर कुमार उपाध्याय यांनी सांगितले. भारतीय राज्यघटनेने ठरवून दिलेल्या आकारातील आणि कापडाचा झेंडाच अधिकृत झेंडा आहे, असे देखील उपाध्याय यांनी म्हटले. एकेकाळी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वीच्या काळात येथे आठशे कर्मचारी काम करत होते. मात्र, सध्या 20 कर्मचाऱ्यांवर काम करावे लागत आहे,असे देखील त्यांनी सांगितले. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून दर वर्षी मार्चमध्ये तिरंगा झेंडा निर्मितीला सुरुवात केली जाते. मात्र, या वर्षी लॉकडाऊनमुळे झेंडा निर्मिती थांबवण्यात आली होती.