महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याआधी झोपडपट्टीवासियांना परिसर सोडण्याचे अहमदाबाद पालिकेचे आदेश

शहरातील मोटेरा येथील स्टेडिअममध्ये डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान मोदी यांच्या समवेत सयुक्त सभेला संबोधन करणार आहे. सभेत ७० हजार लोकांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे. स्टेडिअमच्या अवती भोवती काही झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्या ट्रम्प यांचा नजरेस येऊ नये, यासाठी महापालिकेने मोटेरा येथील रहिवाशांना आपली घरे सोडण्यासाठी नोटीस बजावल्याची चर्चा आहे.

ahmedabad muncipal corporation
ट्रंप

By

Published : Feb 18, 2020, 1:53 PM IST

अहमदाबाद (गुजरात)- अहमदाबाद महापालिकेने मोटेरा येथील झोपडपट्टी रहिवाशांना परिसर सोडण्याबाबत नोटीस बजावली आहे. महापलिकेकडून झोपडपट्टी रहिवाशांना हा परिसर सोडण्यासाठी ७ दिवस दिले आहेत. अमरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱ्यानिमित्त ही नोटीस बजावण्यात आल्याचे समजले आहे.

येत्या २४ फ्रेब्रुवारीला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सपत्निक भारत दौऱ्यावर येणार आहेत. ते अहमदाबादलाही जाणार आहे. त्यांच्या आगमनानिमित्त शहरात साफसफाई आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे. यावेळी अहमदाबाद महापालिकने ट्रम्प यांच्या खातर शहरातील झोपडपट्ट्या लपविण्याचा चंगच बांधल्याचे दिसून येत आहे. शहरातील देवसारन झोपडपट्टी परिसर ट्रम्प यांच्या नजरेस येऊ नये म्हणून तिला झाकण्यासाठी अहमदाबाद महापलिकेने भिंत उभारायला सुरूवात केली आहे.

शहरातील मोटेरा परिसरात देखील पालिकेकडून असाच पवित्रा घेण्यात आला आहे. मोटेरा येथील स्टेडिअममध्ये डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान मोदी यांच्या समवेत सयुक्त सभेला संबोधन करणार आहे. सभेत ७० लाख लोकांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे. स्टेडिअमच्या अवती भोवती काही झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्या ट्रम्प यांचा नजरेस येऊ नये यासाठी माहापालिकेने मोटेरा येथील रहिवाशांना आपली घरे सोडण्यासाठी नोटीस बजावल्याची चर्चा आहे.

हही वाचा-प्रसिद्ध बंगाली अभिनेते, माजी खासदार तपस पॉल यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details