आग्रा - जिल्ह्यातील खंदौळीमध्ये एका २५ वर्षीय तरुणीची भरदिवसा कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कस्बामध्ये राहणाऱ्या दिलीप (वय २३) हा आरोपी फरार आहे. नातेवाईक आणि परिसरातील संतप्त नागरिकांनी आरोपीच्या घरावर हल्ला करत दरवाजाची तोडफोड केली.
आग्र्यात भरदिवसा तरुणीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या - आग्रा
जिल्ह्यातील खंदौळीमध्ये एका २५ वर्षीय तरुणीची भरदिवसा कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कस्बा खंदौळीच्या व्यापारी मोहल्ल्यात शेजारी राहणाऱ्या तरुणाने तरुणीचा कुऱ्हाडीने गळा तोडून हत्या केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी आरोपी आणि त्याचे कुटुंबीय तेथून पसार झाले होते. पोलिसांनी आरोपीची शोधाशोध सुरू केली आहे.
शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
संबंधित मुलगी पाणी भरण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. पाणी भरण्याअगोदरच तिच्यावर गळ्यावर सपासप वार केले. त्यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला. थरारक दृश्य पाहिल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. नातेवाईकांनी आग्रा-हाथरस रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. लोकांना मोठ्या कसरतीनंतर शांत करून रात्री ९ वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला. चार वर्षांपूर्वी मृत मुलीच्या काकांवरही आरोपीने कुऱ्हाडी प्राणघातक हल्ला केला होता.