महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शत्रूघ्न सिन्हानंतर आता मजीद मेमन यांच्याकडून मोहम्मद अली जीनांवर स्तुतीसुमने.. - jinnah

मेमन यांनी सिन्हा कालपर्यंत भाजपमध्येच होते, असे म्हटले आहे. भाजपच्या शिकवणीमुळेच ते राष्ट्रद्रोही झालेले असू शकतात, असा टोला मेमन यांनी शाह यांना लगावला आहे.

मजीद मेमन

By

Published : Apr 28, 2019, 12:14 PM IST

मुंबई - काँग्रेस नेते शत्रूघ्न सिन्हा यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते मजीग मेमन यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांची स्तुती केली आहे. तसेच, जीना यांचे स्वातंत्र्य संग्रामात योगदान होते, असे म्हटले आहे. तसेच, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी जीना हे मुस्लीम असल्याने शत्रूघ्न सिन्हा यांना राष्ट्रद्रोही ठरवून टाकले आहे.

'महात्मा गांधींपासून मोहम्मद अली जीनांपर्यंत सर्वजण काँग्रेस परिवाराचा भाग आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य आणि विकासात योगदान दिले,' असे सिन्हा यांनी म्हटले होते. मेमन यांनी सिन्हा कालपर्यंत भाजपमध्येच होते, असे म्हटले आहे. भाजपच्या शिकवणीमुळेच ते राष्ट्रद्रोही झालेले असू शकतात, असा टोला मेमन यांनी शाह यांना लगावला आहे. सिन्हा यांनी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील काँग्रेस प्रचार सभेत हे वक्तव्य केले होते. त्यानंतर पक्षाने याची जबाबदारी झिडकारल्यानंतर त्यांनी आपल्याकडून चुकून असे बोलले गेल्याचा पवित्रा घेतला होता. तसेच, 'आपल्याला मौलाना आझाद म्हणायचे होते. चुकून मोहम्मद अली जीना म्हटले,' असे ते म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details