काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतर प्रचाराच्या गाण्यातून 'त्या' ओळी हटवल्या - bjp
'केंद्रातील रालोआ सरकारने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे. तसेच, विविध संप्रदायांना एकमेकांविरोधात चिथावले आहे,' असे या ओळींमध्ये म्हटले होते. काँग्रेसच्या दोन्ही गाण्यांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतर काँग्रेसच्या प्रचाराच्या गाण्यातून काही ओळी हटवण्यात आल्या आहेत. या ओळींमुळे 'निश्चितपणे समाजिक शांतता आणि सलोखा नष्ट होईल,' तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यामुळे आयोगाने यावर आक्षेप घेतला. काँग्रेसने आता या ओळी आणि ही कडवी गाण्यातून काढून टाकली आहेत.
या गाण्यातून काँग्रेसने आश्वासन दिलेल्या किमान उत्पन्न योजनेविषयी (NYAY - न्यूनतम आय योजना) सांगण्यात आले होते. 'केंद्रातील रालोआ सरकारने द्वेष पसरवण्याचे काम केले आहे. तसेच, विविध संप्रदायांना एकमेकांविरोधात चिथावले आहे,' असे या ओळींमध्ये म्हटले होते. काँग्रेसच्या दोन्ही गाण्यांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत.
काँग्रेसने 'अब होगा न्याय' अशा आशयाचे गाणे प्रसिद्ध केले होते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशातील २० टक्के गरिबांना वर्षाला ७२ हजारांचे किमान उत्पन्न मिळवून देण्यात येईल, असे म्हटले होते.