महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 8, 2019, 5:57 PM IST

ETV Bharat / bharat

बिहार : मुझफ्फरपूरमध्ये आतापर्यंत चमकीचे १४२ बळी, आकडा वाढण्याची शक्यता

रुग्णालयामध्ये आतापर्यंत एकूण ४५४ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यापैकी ३०२ रुग्णांच्या प्रकृतीत सुधार झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. तर, आतापर्यंत १२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुझफ्फरपूरमध्ये आतापर्यंत चमकीचे १४२ बळी

मुझफ्फरपूर - बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हात चमकीने घेतलेल्या बळींचा आकडा १४२ वर पोहचला आहे. मागील काही महिन्यांपासून चमकी रोगाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. यामध्ये अनेक रुग्ण जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

श्रीकृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधीक्षक एसके शाही यांनी माहिती देताना सांगितले, की एकूण ४५४ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यापैकी ३०२ रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. तर, आतापर्यंत १२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर पीआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मागील काही दिवसांपेक्षा सध्या परिस्थितीत सुधारणा दिसून येत आहे. कालपासून (रविवार) रुग्णालयात चमकीच्या एकाही रुग्णाची भरती झाली नाही.

अधिकृत माहितीनुसार, एसकेएमसीएचमध्ये आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात चमकीचे सर्वात जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. तर, केजरीवाल रुग्णालयात २१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चमकीत मृत्यू झालेल्या कुटुंबांसाठी ४ लाखाचा मदतनिधी जाहीर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details