पठाणकोट - पंजाबच्या गुरुदासपूर येथून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकलेला अभिनेता-राजकारणी सनी देओल चक्क हरवला आहे. होय, सनी देओल हरवलाय, अशा आशयाचे पोस्टर घेऊन नागरिक पठाणकोटच्या रेल्वेस्टेशन पासून तर चौकाचौकात फिरत आहेत.
आमचा खासदार बऱ्याच दिवसांपासून आमच्याकडे फिरकलाच नाही, असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे.
खासदार बनलेला सनी देओल हरवला! हेही वाचा -'तख्त'च्या लोकेशनचा शोध संपला, करण जोहरने शेअर केला फोटो
सनी देओल निवडून आल्यानंतर तो नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र, सनी देओल बऱ्याच दिवसांपासून आमच्या भागात फिरकले नाही. हे पोस्टर्स पाहून तरी त्यांना खासदारकीची आठवण येईल, असे येथील नागरिकांनी म्हटले आहे.
हेही वाचा -'केजीएफ' स्टार यशच्या वाढदिवसाला ५ हजार किलोचा केक, जागतिक विक्रमात नोंद!!