नवी दिल्ली - नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधातील आंदोलनादरम्यान दिल्लीतील हिंसाचाराला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. त्यावर भाजपने दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपल्या पक्षाचा इतिहास तपासून घ्यावा, असा पलटवार आपचे नेते संजय सिंह यांनी केला.
'भाजपने दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आपला इतिहास तपासून घ्यावा'
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधातील आंदोलनादरम्यान दिल्लीतील हिंसाचाराला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.
देशामध्ये द्वेष आणि दंगली पेटवून राजकारण करण्याचा भाजपचा इतिहास आहे. जेव्हा भाजपचे नेते हिंसेविरुद्ध भाषण देतात. तेव्हा गब्बर सिंह अहिंसावर उपदेश देत असल्यासारखे वाटते, असे संजय सिंह म्हणाले.
दिल्लीमध्ये आंदोलनामध्ये झालेल्या हिंसाचाराला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जबाबदार असून त्यासाठी त्यांना माफ केले जाऊ शकत नाही. आपचे आमदार अमानतुल्ला यांनी चिथावणीखोर विधानेकरून जमावाला भडकवले, असे जावडेकर म्हणाले होते. गेल्या 4 वर्षांमध्ये केजरीवाल सरकारने काहीच काम केले नाही. मात्र, विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर काम केल्याचा दिखावा करत असल्याचेही जावडेकर म्हणाले.