नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे आज (रविवार 16 फेब्रुवारी ) रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. उपराज्यपाल अनिल बैजल हे केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारुन ७० पैकी ६२ जागा 'आप'ने जिंकल्या. यानंतर अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले होते. त्यांचा शपथविधी सोहळा आज दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे.
आज तिसऱ्यांदा घेणार अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाची शपथ...
हेही वाचा...अरविंद केजरीवाल दिल्लीकरांसोबत घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, नेत्यांना आमत्रंण नाही
अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तर इतर सहा मंत्र्यांचाही शपथविधी त्यांच्यासोबत होणार आहे. या सहा मंत्र्यांमध्ये मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे. १६ फेब्रुवारी म्हणजेच आज रामलीला मैदानावर सकाळी १० वाजता हा सोहळा पार पडणार आहे.
दिल्लीतील अभुतपूर्व विजयानंतर केजरीवाल घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ...
नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या निवडणुकीत 'आम आदमी पार्टी'च्या अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसला धूळ चारली. भाजपला अवघ्या आठ जागा जिंकण्यात यश आले. तर काँग्रेसला आपले खाते देखील उघडता आले नाही. विधानसभेत 62 जागा घेत केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (आप) हा पक्ष मोठ्या विजयासह पुन्हा सत्तेवर आला. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे आज तिसऱयांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
भाजप आणि काँग्रेसला पराभवाची धूळ चारत 'आप'चा विजय...
हेही वाचा...गोली मारो गद्दारोंको... 'वाचाळवीरांच्या वक्तव्यानेच कदाचीत आमचा पराभव'
दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर आज (रविवारी) सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. संपुर्ण दिल्लीकर जनतेला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच या शपथविधी सोहळ्याला केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रित केले आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असलेले अरविंद केजरीवाल यांनी अलिकडच्या परंपरेप्रमाणे आपल्या शपथविधी सोहळ्यासाठी इतर कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला निमंत्रित केलेले नाही. तर, गेल्या पाच वर्षांमध्ये दिल्लीचा कारभार चालवण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील ५० जणांना आमंत्रित केले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीला खास पाहुण्यांना आमंत्रण...
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे.
रामलीला मैदानावर शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी...