महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फर्रुखाबाद: ओलीस ठेवलेल्या 23 मुलांची सुखरूप सुटका; पोलीस एन्काऊंटरमध्ये आरोपी ठार - उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे एका माथेफिरू तरुणाने 23 मुलांना एका खोलीत कैद केले होते.

एका माथेफिरू तरुणाने 12 मुलांना केलं कैद
एका माथेफिरू तरुणाने 12 मुलांना केलं कैद

By

Published : Jan 30, 2020, 9:52 PM IST

Updated : Jan 31, 2020, 5:05 AM IST

फर्रुखाबाद- उत्तर प्रदेशमध्ये एका माथेफिरू तरुणाने 23 मुलांना एका खोलीत कैद केले होते. या सर्व मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली असून आरोपी असलेल्या सुभाष बाथम याला पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले आहे. फर्रुखाबाद येथील मोहम्मदाबादच्या कठारीया गावामध्ये ही घटना घडली आहे.

ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका...आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

आरोपीच्या पत्नीचाही मृत्यू

दरम्यान, 23 मुलांना ओलीस ठेवलेला आरोपी सुभाष बाथमचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. चिडलेल्या गावकऱयांनी आरोपीची पत्नी रुबी हिला देखील मारहाण केली आहे. यात ती गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिली मृत घोषित केले आहे.

एका माथेफिरू तरुणाने 20 मुलांना ठेवलं ओलीस

माथेफिरु तरुणाने वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना घरी बोलावले होते. त्यानंतर त्यांने मुलांना कैद केले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चारी बाजूने माथेफिरुच्या घराला वेढा घातला होता. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. गावातील काही लोकांनी त्याच्या पत्नीवर अत्याचार केला होता. त्या लोकांना माझ्या हवाली केल्यास मुलांना सोडण्यात येईल, अशी त्याने मागणी केल्याची माहिती आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चारी बाजूने माथेफिरुच्या घराला वेढा घातला आहे.


माथेफिरु तरुणांवर गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वीच तो तुरूंगात गेला होता. सूड घेण्याचा प्रयत्न त्यांने मुलांना कैद केले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस त्यांची समज घालत असून मुलांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलीस मुलांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
Last Updated : Jan 31, 2020, 5:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details