महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ऑनर किलिंग : छत्तीसगडमध्ये प्रेमीयुगुलाला जाळले जीवंत

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात चुलत बहिण-भावाचे प्रेमसंबंध जुळून आले होते. याची माहिती दोघांच्या घरच्यांना मिळाली. त्यानंतर दोन्ही घरच्यांनी या प्रेमीयुगुलाला तुम्ही नात्याने चुलत बहिण-भाऊ आहात. यामुळे समाजात आपली बदनामी होईल. परंतू या दोघांचे प्रेम प्रकरण सुरूच राहिले. त्यानंतर हे दोघे काही दिवसांपूर्वी चेन्नईला पळून गेले. त्यानंतर दोघे दुर्ग येथे परत आले. यामुळे प्रेयीसचा भाऊ आणि काकाने रागाच्या भरात या दोघांना सजा म्हणून जीवंत जाळल्याची माहिती समोर आली आहे.

a loving couple was burnt alive in durg
ऑनर किलिंग : छत्तीसगडमध्ये प्रेमीयुगुलाला जाळले जीवंत

By

Published : Oct 11, 2020, 7:58 PM IST

दुर्ग -छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात प्रेमीयुगुलाला जीवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. या दोघांचे मृतदेह सिरसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कृष्णा नगर येथे जळालेल्या अवस्थेत मिळून आले आहेत. या ऑनर किलिंगच्या घटनेमुळे दुर्ग जिल्हा हादरला आहे.

या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात चुलत बहिण-भावाचे प्रेमसंबंध जुळून आले होते. याची माहिती दोघांच्या घरच्यांना मिळाली. त्यानंतर दोन्ही घरच्यांनी या प्रेमीयुगुलाला तुम्ही नात्याने चुलत बहिण-भाऊ आहात. यामुळे समाजात आपली बदनामी होईल. परंतू या दोघांचे प्रेम प्रकरण सुरूच राहिले. त्यानंतर हे दोघे काही दिवसांपूर्वी चेन्नईला पळून गेले. त्यानंतर दोघे दुर्ग येथे परत आले. यामुळे प्रेयीसचा भाऊ आणि काकाने रागाच्या भरात या दोघांना सजा म्हणून जीवंत जाळल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details