गोरखपूर -देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे बाजार जनावरांनी भरला आहे. सध्या गोरखपूरमधील एक बकरा चर्चेत आहे. या सलमान नावाच्या बकऱ्याची किंमत चक्क 8 लाख रुपये आहे. हा खुपच खास बकरा असल्याचं त्याच्या मालकाने म्हटले आहे.
'या' सलमानची किंमत आहे चक्क 8 लाख रुपये, शरीरावर लिहिलंय अल्लाह.. - goat
देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे
सलमान
सलमानच्या शरिरावर अल्लाह लिहलेलं आहे. तर सलमानचा दिवसाचा खर्च 800 रुपये असून तो बदाम, काजू खातो. त्याचे वजन तब्बल 95 किलो असल्याचं सलमानचा मालक मोहम्मद यांनी सांगितले आहे.
मुस्लिम समाजात बकरी ईदला विशेष महत्व आहे. मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बकऱयाची कुर्बानी दिली जाते.