आगरताळा - त्रिपूरामध्ये १० नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामधील एक जण महिलेच्या परिचयाचा असून, बाकीच्यांपैकी काहींची नावे तिने ऐकली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यानुसार पोलीस या नराधमांचा शोध घेत आहेत. तसेच, महिलेवर देखील उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या मुलाच्या उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. तिथून रात्री उशीरा परतताना वाहन न मिळाल्याने तिने, आपल्या एका ओळखीच्या ट्रक चालकाला घरी सोडण्याची विनंती केली. त्यानंतर, आपण नेहमीच्या रस्त्याने न जाता, दुसऱ्याच रस्त्याने जात आहोत हे तिच्या लक्षात आले. त्याबाबत विचारणा केली असता, आपल्याला एका मित्राकडून पैसे घ्यायचे असल्याचे ट्रक चालकाने सांगितले.