धौलपूर - कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे रोजंदारीवर काम करण्याऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली. तेव्हा दिल्लीतील रोजंदारीवर काम करणारे उत्तर प्रदेशचे मजूर आपापल्या गावी जाण्यास पायी निघाले. मंगळवारी, तब्बल १० हजार मजूर सैया बॉर्डर पोहोचले. तेव्हा मजूरांची संख्या पाहून धौलपूर पोलिसांसह जिल्हा प्रशासन गांगरले.
पोलिसांनी पुढे जाण्यास मज्जाव केल्याने, त्या मजूरांनी आजूबाजूच्या शेत आणि महामार्गावर आपला डेरा टाकला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राकेश जयस्वाल घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महामार्गावर थांबलेल्या लोकांना बाजूला केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.