शिमला(नाहन) - देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहे. या काळात अनेक नागरिकही आपापल्यापरिने प्रशासनाला मदत करत आहेत. हिमाचल प्रदेशमधील नाहन येथे अशीच एक व्यक्ती राहते जी वयाच्या ८०व्या वर्षीही कोरोना विरुद्धच्या लढ्यात उतरली आहे. आशा लता पुंडीर असे या ८० वर्षाच्या आजीबाईचे नाव आहे.
वयाच्या ८०व्या वर्षी 'त्या' शिवत आहेत मास्क! - हिमाचल प्रदेश कोरोना अपडेट
शासन, प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहे. या काळात अनेक नागरिकही आपापल्यापरिने प्रशासनाला मदत करत आहेत. हिमाचल प्रदेशमधील नाहन येथे अशीच एक व्यक्ती राहते जी वयाच्या ८०व्या वर्षीही कोरोना विरुद्धच्या लढ्यात उतरली आहे. आशा लता पुंडीर असे या ८० वर्षाच्या आजीबाईचे नाव आहे.
सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कला मोठी प्रमाणात मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने मास्कची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मदत म्हणून आशा लता पुंडीर यांनी शिलाईमशीनवर मास्क शिवण्यास सुरुवात केली आहे. त्या वयाच्या ५८व्या वर्षी शिवणकाम शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. मात्र, आता देश संकटात असताना त्यांनी पुन्हा शिलाईमशीन हातात घेतली आहे.
आशालता या कपड्यापासून मास्क तयार करतात. हे मास्क धुऊन पुन्हा वापरता येतात. दिवसभरात त्या १५ ते २० मास्क शिवतात. आत्तापर्यंत त्यांनी ३०० पेक्षा जास्त मास्क शिऊन लोकांमध्ये वाटले आहेत. कोरोना संकटाच्या काळात समाजाची मदत करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे मी मास्क शिवण्याचे काम करत आहे. त्यांनी मास्क शिवण्याचे प्रशिक्षण देण्याचीही तयारी दर्शवली आहे.