कोलकाता - कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढतच चालला आहे. आज पश्चिम बंगालमधील कालिंपाँग येथे 54 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रलय आचार्य यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोनाने घेतला आणखी एक बळी, पश्चिम बंगालमध्ये एकाचा मृत्यू
आज पश्चिम बंगालमधील कालिंपाँग येथे 54 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रलय आचार्य यांनी ही माहिती दिली.
गेल्या 23 मार्चला कोरोनामुळे कोलकातामधील एका 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 वर पोहचली आहे. देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 1 हजार 71 वर पोहचली आहे. यातील 924 रुग्ण अॅक्टिव्ह स्टेजमध्ये म्हणजेच कोरोना संसर्ग झालेले आहेत. तर 99 जर पूर्णत: बरे झाले असून 29 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सुधारित आकडेवारी जाहीर केली.
कोरोनाने जगभरात थैमान घातले असून सुमारे 179 देशांना याचा फटका बसला आहे. जगभरात या कोरोना विषाणूमुळे 29 हजार 957 पेक्षाअधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधून या आजाराचा फैलाव झाला असून आता इटलीमध्ये या विषाणूने सर्वाधिक थैमान घातले आहे. तसेच स्पेनमध्येही कोरोनामुळे अनेक जण दगावले आहेत.