वयाच्या ९७ व्या वर्षी निवडणुकींच मैदान गाजवत आजीबाई बनल्या सरपंच - आजीबाई सरपंचपदी विराजमान
विद्या देवी सिकार जिल्ह्यातील निम का ठाणा उपविभागामध्ये येणाऱ्या पुरानावास या गावाच्या सरपंच बनल्या आहेत. आजीबाईंच्या या उत्साहामुळे नक्कीच इतर महिलांना राजकारणात काम करण्याची प्रेरणा मिळेल.
विद्या देवी
जयपूर - राजस्थानातील एक आजीबाईंनी वयाच्या ९७ व्या वर्षी निवडणुकांच मैदान गाजवलं. ९७ व्या वर्षी त्या सरपंचपदाची निवडणूक जिंकल्या आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला २०७ मतांनी मागे टाकत वृद्धापकाळात त्या आता सरपंचपदी विराजमान होणार आहेत. विद्यादेवी असे नवनिर्वाचित वृद्ध महिला सरपंचाचे नाव आहे.