महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजधानी दिल्लीत दिवसभरात 93 कोरोनाचे नवे रुग्ण, एकून 386 जणांना बाधा - delhi corona count

दिल्ली सरकारने ट्विटरद्वारे कोरोनाग्रस्तांची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी आकडेवारी पाहून कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

arvind kejriwal
अरविंद केजरीवाल

By

Published : Apr 3, 2020, 11:43 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये आज दिवसभरामध्ये 93 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 386 गेला आहे. यातील 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण पूर्णत: बरे झाले आहेत.

दिल्ली सरकारने ट्विटरद्वारे कोरोनाग्रस्तांची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. रेशन कार्ड असलेल्या 71 लाख नागरिकांना अन्यधान्य देण्यात येत असून यातील 60 टक्के नागरिकांना धान्य मिळाल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती

  • आज दिवसभरात 93 नवीन कोरोनाग्रस्त आढळले.
  • परदेशवारी केलेले कोरोनाग्रस्त - 58
  • एकमेकांच्या संपर्कात आल्याने - 38 जणांना बाधा
  • मरकझ कार्यक्रमाशी संबधीत - 259 रुग्ण
  • निगराणीखाली असलेले - 31 जण संभाव्य रुग्ण
  • पूर्णत: बरे झालेले रुग्ण - 10
  • मृत्यू - 6

ABOUT THE AUTHOR

...view details