नवी दिल्ली -आमदार खरेदी प्रकरणी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या चौकशीसाठी 8 सदस्यांची विशेष टीम गठित केली आहे. एसओजी व्यतिरिक्त एटीएस, सीआयडी सीबी आणि जोधपूर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. या विशेष पथकाची कमान पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक विकास शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. एसपी विकास शर्मा यांच्या सुपर व्हिजनमध्ये एसओजीची एक टीम शुक्रवारी मानेसरला चौकशीसाठी पोहोचली होती.
विकास शर्मा व्यतिरिक्त या टीममध्ये एटीएसचे अतिरिक्त एसपी धर्मेंद्र यादव, सीआयडी सीबीचे अतिरिक्त एसपी जगदीश व्यास, जोधपूर पोलीस आयुक्तालय एसीपी कमल सिंग, एटीएसचे डीवायएसपी मनीष शर्मा, सीआयडी सीबी निरीक्षक कैलाश जिंदल, एटीएसचे पोलीस निरीक्षक सुमन काविया यांचा आणि एटीएसचे पोलीस निरीक्षक रमेश परिक यांचा समावेश आहे. यासह संपूर्ण प्रकरणात सखोल संशोधन करून आरोपींना अटक करण्याचे निर्देशही या टीमला देण्यात आले आहेत.