मोरादाबाद (उत्तर प्रदेश) - मागच्या आठवड्यात नवाबपुरा येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेत अटक करण्यात आलेल्या ५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर तब्बल ७३ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे.
मोरोदाबाद येथे कोरोनाबाधित आरोपींमुळे ७५ पोलिसांना क्वारंटाईनचे आदेश
नवाबपुरा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांवर १७ जणांनी दगडफेक केली होती. या घटनेतील ५ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची कोरोना तपासणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने आता पोलिसांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी अमित पाठक यांनी सांगितले, की ७३ पोलिसांना क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे.