महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ७०४ नवे रुग्ण; २८ नवे बळी.. - भारत कोरोना रुग्ण

एकूण रुग्णांपैकी ३,८५१ रुग्ण हे अ‌ॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे ३१८ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या २८ नव्या बळींची नोंद झाली आहे.

704 new cases reported on monday in india total numbers of coronavirus cases reaches to 4281
देशात गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ७०४ नवे रुग्ण; २८ नवे बळी..

By

Published : Apr 6, 2020, 8:02 PM IST

Updated : Apr 6, 2020, 8:50 PM IST

नवी दिल्ली - देशभरात आज एकूण ७०४ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४,२८१ झाली आहे.

दरम्यान एकूण रुग्णांपैकी ३,८५१ रुग्ण हे अ‌ॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे ३१८ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या २८ नव्या बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा १११ वर पोहोचला आहे.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (868) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ तामिळानाडू (६२१) आणि दिल्लीचा (५२३) क्रमांक लागतो. तर सर्वाधिक बळीदेखील महाराष्ट्रातच (५२) गेले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात (१२) आणि मध्य प्रदेशचा (९) क्रमांक लागतो.

हेही वाचा :'कोविड-19' विरुद्ध लढण्यास 'डीआरडीओ' सज्ज!

Last Updated : Apr 6, 2020, 8:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details