गांधीनगर - गुजरात राज्यामध्ये कोरोनाचे आज दिवसभरात 70 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. एकून कोरोनाग्रस्तांची संख्या 378 झाली आहे, अशी माहीती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशभरामध्ये कोरोनाचे 6 हजार 412 रुग्ण आढळून आले आहेत.
गुजरातमध्ये कोरोनाचे 70 नवे रुग्ण; एकूण 378 रुग्ण - कोरोना संसर्ग
देशभरामध्ये कोरोनाचे 6 हजार 412 रुग्ण आढळून आले आहेत. गुजरात राज्यातही कोरोनाचे संकट गंभीर होताना दिसत आहे.
गुजरात राज्यातही कोरोनाचे संकट गंभीर होताना दिसत आहे. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. 13 पेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. तामिळनाडू राज्यात 834 तर दिल्लीत 720 कोरोनाचे रुग्ण आहेत.
देशामध्ये कोरोनाचा सामाजिक स्तरावर फैलाव झाला नसून घाबरून जाण्याची गरज नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सद्य स्थितीत कोरोन स्थानिक स्तरावर किंवा सामाजिक स्तरावर पोहचला आहे, हे खरे आव्हान नाही. कोरोनाचा प्रसार कोणत्या स्तरावर आहे, हे आम्ही तुम्हाला कळवू, आत्ता घाबरून जाण्याची गरज नाही, असे अगरवाल म्हणाले. वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारांनी संचारबंदी वाढविण्याची वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.