महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यसभा निवडणूक : अखिलेश यादवांनी बसपाचे सात आमदार फोडले

राज्यसभा निवडणुकीवरून बसपा प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यातील राजकिय लढाई टोकाला पोहोचली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने बसपाचे सात आमदार फोडले आहे. लोकसभा निवडणुकीत बसपा आणि सपा एकत्र निवडणूक लढली होती.

यादव
यादव

By

Published : Oct 29, 2020, 8:53 AM IST

लखनऊ:उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या 10 जागांसाठी राजकिय पक्षांमध्ये चूरस निर्माण झाली आहे. यानिमित्ताने बसपा प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यातील राजकिय लढाई टोकाला पोहोचली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने बसपाचे सात आमदार फोडले आहे. लोकसभा निवडणुकीत बसपा आणि सपा एकत्र निवडणूक लढली होती. याचा फायदा समाजवादी पार्टी ऐवजी बसपालाच झाला होता. सपाचे पाच तर बसपाचे १० खासदार निवडून आले होते.

अखिलेश यादवांनी बसपाचे फोडले दहा आमदार

अखिलेश यादवांची सर्जिकल स्ट्राईक

अखिलेश यादव यांनी मायवती यांचा लोकसभा निवडणुकीतील बदला घेतला असल्याचे बोलले जात आहे. राज्यसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान अखिलेश यादव यांनी मायावतीशी हातमिळवणी केली. मात्र संधी मिळताचा बसपावर जोरदार प्रहार केला. सपाने बसपाचे सात आमदार फोडले आहेत.

भाजपाची टीका

या सर्व घटनाक्रमावर भाजपाने टीका केली आहे. आमदारांचा त्यांच्या पक्षावर विश्वास राहिला नाही. योगी सरकारच्या कामगिरीमुळे विरोधकांमध्ये भीती निर्माण झाली असल्याची टीका भाजपा प्रदेश प्रवक्ते हीरो वाजपेयींनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details