ललितपूर (उ.प्रदेश) - हाथरसच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशात राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघणारी आणखी एक घटना समोर आली आहे. एका 65 वर्षांच्या दलित वृद्धाला अमानुष मारहाण झाल्याचे एका आठवड्यानंतर उघडकीस आले. त्यावेळी पीडित वृद्धाच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र आरोपींकडून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात येत होता.
रोडा गावात राहणाऱ्या पीडित वृद्धाने याबाबत खुसाला केला आहे. सोनू यादव नावाच्या एका व्यक्तीने त्यांना मूत्राने भरलेला कप दिला. ते पिण्यास नकार दिल्याने त्यांना काठीने मारहाण करण्यात आली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याचे वृद्धाने सांगितले. याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, आरोपीने त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला, असे ते म्हणाले.