महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लेटर वॉर: 49 मान्यवरांनी मोदींना लिहिलेल्या पत्राला 62 कलाकारांचे प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचीगच्या घटनेवरून 49 मान्यवरांनी लिहलेल्या पत्रावर अभिनेत्री कंगना रनौतसह 62 कलाकारांनी पत्राद्वारेच टीका केली आहे.

अभिनेत्री कंगना रनौत

By

Published : Jul 26, 2019, 12:58 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचीगच्या घटनेवरून 49 मान्यवरांनी लिहिलेल्या पत्रावर अभिनेत्री कंगना रनौतसह 62 कलाकारांनी पत्राद्वारेच टीका केली आहे. 'जेव्हा काश्मीरमध्ये शाळा बंद करण्यात आल्या, आदिवासींच्या हत्या झाल्या तेव्हा हे लोक कुठे होते', अशी टीका त्यांनी केली आहे.


ठराविक घटनांचा उल्लेख करुन मुद्दाम देशभरात सरकारविरोधी वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने ते पत्र मोदींना लिहिण्यात आले आहे. जवाहरलला नेहरु विद्यापीठामध्ये देशविरोधी नारे लागले. आदिवासी आणि गरीब लोकांच्या हत्या झाल्या. काश्मीरमध्ये शाळा बंद केल्या गेल्या, तेव्हा ही स्वंयघोषित संविधान रक्षणकर्ती लोकं का गप्प होती. चुकीच्या हेतूने आणि राजकीय खेळीतून त्या 49 कलाकारांनी मोदींना पत्र पाठवले आहे, असे उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


यामध्ये कंगना रनौत, सोनल मानसिंह, प्रसुन्न जोशी , स्वप्न दास गुप्ता, अशोक पंडीत, मधुर भंडारकर, विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी, मालिनी अवस्थी, मनोज जोशी, मनोज दीक्षित, संध्या जैन, डॉ. विक्रम संपत, प्रतिभा प्रल्हाद यांच्यासाख्या कलाकार आणि लेखकांचा समावेश आहे.


23 जुलैला देशभरात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्यामध्ये मणिरत्नम, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 49 जणांचा समावेश होता.

ABOUT THE AUTHOR

...view details