महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पश्चिम बंगालमधील ६१ बालकामगारांची चेन्नईमधून सुटका - बालकामगारांची सुटका

सर्व लहान मुले पश्चिम बंगालमधील असून त्यांना दागिने बनविण्याच्या कंपनीत वेठबिगारीवर ठेवण्यात आले होते.

बालकामगार

By

Published : Sep 10, 2019, 2:27 PM IST

चेन्नई- तमिळनाडूमधील चेन्नई शहरातून ६१ बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. ही सर्व लहान मुले पश्चिम बंगालमधील असून त्यांना दागिने बनविण्याच्या कंपनीत वेठबिगारीवर ठेवण्यात आले होते. शहरातील वॉलटेक्स रोड भागातून मुलांची शहर पोलिसांनी सुटका केली.

हेही वाचा - अनाथ कार्तिकला मिळाली आई-वडिलांची माया, स्पेनच्या जोडप्यानं घेतलं दत्तक

दागिन्यांच्या कंपनीत लहान मुले काम करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. हे ठिकाण चेन्नई रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. त्यानुसार पोलीसांनी ५ ठिकाणी छापे मारले. यामध्ये ६१ मुलांची सुटका करण्यात आली.

सर्व मुलांना बाल गृहामध्ये ठेवण्यात आले आहे. प्राथमिक तपासात सर्व मुले पश्चिम बंगालमधील असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्याकडून बळजबरीने काम करून घेतले जात होते.

हेही वाचा - कामगारांना त्यांच्या कष्टाचे मोल मिळाले पाहिजे- डॉ. संजय कुटे

ABOUT THE AUTHOR

...view details