महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वंदे भारत मिशन : परदेशात अडकलेले ६ हजार ३७ भारतीय मायदेशी परतले - air india news

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिक विविध देशांत अडकून पडले आहेत. त्यामुळे परदेशीतील नागरिकांना माघारी आणण्यासाठी आत्तापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

Vande Bharat Mission
वंदे भारत मिशन

By

Published : May 12, 2020, 7:43 PM IST

नवी दिल्ली -केंद्र सरकारने कोरोना प्रादुर्भावामुळे परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस विमानांद्वारे हे मिशन राबविण्यात येत आहे. ७ तारखेला मिशन सुरू झाल्यापासून ५ दिवसांत ६ हजार ३७ नागरिकांना परत भारतात आणण्यात आले आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिक विविध देशांत अडकून पडले आहेत. त्यामुळे परदेशीतील नागरिकांना माघारी आणण्यासाठी आत्तापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. नागरी उड्डाण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि विविध देशांमध्ये असलेल्या भारतीय दुतावास आणि उच्चायुक्त कार्यालयातील अधिकारी काम करत आहेत. आत्तापर्यंत ३१ फ्लाईट विविध १२ देशांतून काम करत आहेत. याबरोबरच नौदलाच्या जहाजांद्वारेही परदेशात अडकलेल्या नागरिकांना माघारी आणण्यात येत आहे. त्याला 'ऑपरेशन समुद्र सेतू' असे नाव देण्यात आले आहे.

एअर इंडिया आणि सहकारी कंपनी एअर इंडिया एक्स्प्रेसद्वारे मिशनच्या पहिल्या टप्प्यात ६४ फ्लाईटद्वारे १२ देशांतून नागरिकांना माघारी आणण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १४ हजार ८०० नागरिकांना आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षासंबधीचे नियम पाळत नागरिकांना माघारी आणण्यात येत आहे. वैमानिकांची उड्डानाआधी कोरोना चाचणी घेण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details