महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींविरोधात ५० हळद उत्पादक शेतकऱ्यांचा वाराणसीतून उमेदवारी अर्ज - telangana

किमान आधारभूत किंमत न मिळाल्यामुळे आणि दुष्काळामुळे देशभरातील हळद उत्पादकांवर संकट आले आहे. यंदा हळदीच्या किमती ३ हजार २०० रुपये ते ५ हजार २०० रुपयांपर्यंत कोसळल्या आहेत.

हळद उत्पादक शेतकरी

By

Published : Apr 28, 2019, 9:26 AM IST

नवी दिल्ली - तेलंगणातील निजामाबाद येथील ५० हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या एका गटाने वाराणसी येथे धाव घेतली आहे. हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून लोकसभा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 'कोणालाही विरोध करणे हा आमचा उद्देश नाही. आम्ही केवळ आमच्या समस्यांना प्रकाशात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हळद उत्पादकांसाठी हळद महामंडळ (टर्मरिक बोर्ड) स्थापन करावे आणि हळदीला किमान आधारभूत किंमत द्यावी, अशी आमची मागणी आहे,' असे या शेतकऱ्यांनी म्हटले आहे.


'संपुआ सरकारनेही आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. मोदींनीही तेच केले. आम्ही त्यांच्या विरोधात नाही. तसेच, त्यांच्या विरोधात प्रचारही करत नाही. आम्हाला केवळ आमच्या समस्येला वाचा फोडायची आहे. हळद उत्पादकांसाठी सरकारने हळद महामंडळ (टर्मरिक बोर्ड) स्थापन करावे आणि हळदीला १५ हजार रुपये प्रतिक्विंटल किमान आधारभूत किंमत द्यावी, अशी आमची मागणी आहे,' असे के. नरसिंहन नायडू या शेतकऱ्याने सांगितले आहे.


किमान आधारभूत किंमत न मिळाल्यामुळे आणि दुष्काळामुळे देशभरातील हळद उत्पादकांवर संकट आले आहे. यंदा हळदीच्या किमती ३ हजार २०० रुपये ते ५ हजार २०० रुपयांपर्यंत कोसळल्या आहेत. सध्या नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसकडून अजय राय आणि सप नेत्या शालिनी यादव लढणार आहेत. आप नेते अरविंद केजरीवाल आणि राय २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींविरोधात उभे होते. त्या वेळी, मोदींनी ३.३७ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. वाराणसीत १९ मे रोजी मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details