पाटणा- काही प्रश्नांची उत्तरे देताना दहावी, बारावीच्या मुलांना घाम फुटतो. पण, नालंदा (बिहार) येथे एका शिशू गटात शिकणारा पाच वर्षाचा असा मुलगा आहे. जो प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे चटकन देतो. अली हमजा अंजार आलम, असे त्या मुलाचे नाव आहे. तो कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देतो त्यामुळे आसपासची मंडळी त्याला गुगल बॉय म्हणून संबोधते
'हा' आहे ५ वर्षाचा 'गुगल बॉय', 'ही' आहे त्याची इच्छा
बिहारच्या नालंदा येथे 5 वर्षाच्या अली हामजा या मुलाला गुगल बॉय म्हणून ओळखले जाते.
अली हमजाला बनायचं आहे जिल्हाधिकारी
अली हमजाला पुढे तुला काय व्हायचे आहे, असे विचारले असता माल जिल्हाधिकारी व्हायचे आहे, असे तो म्हणतो. त्याचे आजोबा जायलुल होदा म्हणातात, की अली हमजा हा हजारो प्रश्नांची उत्तरे क्षणार्धात देतो. इतक्या कमी वयातील मुलांना काहीच लक्षात राहत नाही. पण,त्याला सर्व काही लक्षात राहते.
वयाच्या २ वर्षांपासूनच शिक्षणाची आवड
वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच अली हमजाला शिक्षणाची आवड आहे. तो सतत कोणालाही प्रश्न विचारतो. त्याला नवीन काहीही शिकायची खूप आवड आहे. कधी-कधी असे प्रश्न विचारतो की ज्याची उत्तर शिक्षक आणि घरातील मंडळींना माहिती नसतात. जर उत्तरे नाही दिली की तो रडतो, असे अली हमजाची आई शाजिया सुल्ताना यांनी सांगितले.