नवी दिल्ली - कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो अडकलेले परप्रांतीय कामगार आपल्या मूळ राज्यात जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. स्थलांतरीत कामगारांच्या अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. स्थलांतरीत कामगारांना घेऊन महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या ट्रकचा मोठा अपघात झाला. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना सागरमधील बंडा आणि शाहगढ रुग्णालयात दाखल केले आहे.
मध्य प्रदेशातील सागर येथे भीषण रस्ता अपघात, 5 मजूर ठार कामगार महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर येथे जात होते. यावेळी सेमरा पुलाजवळ चालकाचे ट्रकवरील नियत्रंण सुटल्याने अपघात झाला. माहिती मिळताच नैनागीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
शुक्रवारी गुना येथे भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये 3 कामगारांचा मृत्यू तर 13 कामगार जखमी झाले होते. तसेच गुरुवारीही रस्ते अपघातामध्ये 8 मजुरांचा मृत्यू तर 55 कामगार जखमी झाले होते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या औरंगाबादमध्ये एका मालगाडीखाली चिरडून तब्बल १७ मजुरांना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच आज सकाळी औरैया जिल्ह्यात ट्रक अपघातामध्ये 24 जणांच मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे प्रवासी मजुरांचे होत आहे. अनेक अडचणींनाही या प्रवाशी मंजुरांना तोंड द्यावे लागत आहे. अडचणींचा सामना करत घराकडे निघालेल्या मजुरांचा अपघातमध्ये मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेकांच्या नशिबी घरी जाणे लिहिलेच नसावे.