हैदराबाद - जगभरात तसेच देशातही कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. देशातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात 49 हजार 931 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 14 लाख 35 हजार 453 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत देशभरात 32 हजार 771 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत 9 लाख 17 हजार 568 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांचा रिकव्हरी दर काही प्रमाणात वाढला आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ६३.९२ इतका झाला आहे.
कोरोना विळखा : देशात गेल्या २४ तासात 49 हजार 931 नव्या कोरोना रुग्णांची नोंद - लेटेस्ट कोरोना न्यूज
सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत 9 लाख 17 हजार 568 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांचा रिकव्हरी दर काही प्रमाणात वाढला आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ६३.९२ इतका झाला आहे.
कोरोना विळखा : देशात गेल्या २४ तासात 49 हजार 931 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांपर्यंत कमी कालावधीत पोहोचणे शक्य झाले असून त्यांच्यावर वेळेवर उपचारही केले जात आहेत. त्यातून मृत्युदरही कमी करण्यात यश आले आहे. देशातील वैज्ञानिक कोरोनावर लस शोधण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यात लवकरच यश येईल अशी आशा आहे. सध्या भारत हा जगातील क्रमांक तीनचा देश आहे, जिथे सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.