गुवाहाटी - आसाममध्ये ५ जुलैपर्यंत मेंदूच्या रोगाने ४९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर, जवळपास १४९ जण या रोगावर उपचार घेत आहेत, अशी माहिती आसामचे आरोग्य मंत्री हेमंत विश्व सरमा यांनी दिली आहे. बिहारमध्ये मेंदुज्वराने थैमान घातले असून यामध्ये आतापर्यंत शंभराच्यावर मुलांचा मृत्यू झाला आहे.
बिहारनंतर आसाममध्ये मेंदूच्या रोगाने ४९ जणांचा मृत्यू - मेंदुज्वर
राज्य सरकारने रोगामुळे आजारी असलेल्या रुग्णांसाठी निशुल्क परिवहन व्यवस्थेची सोय केली आहे. सरकार सर्व रोग्यांचा खर्च उचलणार आहे. यासोबत राज्य सरकार रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्री सरमा यांनी दिली आहे.
शनिवारी याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्री हेमंत सरमा म्हणाले, कोकराझार सोडून राज्यातील सर्व जिल्हे मेंदूच्या विशिष्ट रोगाच्या प्रभावाखाली आहेत. यातून सावरण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या देखरेखेखाली रक्ताचे नमुणे गोळा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
राज्य सरकारने रोगामुळे आजारी असलेल्या रुग्णांसाठी निशुल्क परिवहन व्यवस्थेची सोय केली आहे. याशिवाय जापानी इंसेफ्लाईटिस आणि अॅक्युट इंसेफ्लाईटिस (एसीएस) यासाठी रुग्णालयात वार्ड आणि खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकार सर्व रोग्यांचा खर्च उचलणार आहे. यासोबत राज्य सरकार रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्री सरमा यांनी दिली आहे.