हैदराबाद - देशात काल २४ तासात ४७ हजार ९०५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते, तर ५२ हजार ७१२ नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यातील ७८ टक्के रुग्ण हे १० राज्यांमधील आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
दरम्यान, कोरोनाविरुद्ध लस शोधण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी बायोटेक्नॉलॉजी विभागाला ९०० कोटींचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
मुंबई -राज्यात आज ७ हजार ८०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १६ लाख ५ हजार ६४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४४ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ४ हजार ४९६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२२ करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४५ हजार ६८२ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
दिल्ली -काल दिल्लीत सर्वात जास्त ८ हजार ५९३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळू आले. दरम्यान,कोविडच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने प्रदेशातील ३३ रुग्णालयांमधील ८० टक्के आयसीयू बेड्स हे कोविड रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीष खंडपीठाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती दिल्ली उच्च न्यायालयाने उठवली आहे.