महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गेल्या चोवीस तासांत ३८ हजार ९०२ कोरोनाबाधितांची नोंद - भारत कोरोना अपडेट

देशभरात गेल्या चोवीस तासांत ३८ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर, ५४३ जणांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १० लाख ७७ हजार ६१८ झाली असून यात ३ लाख ७३ हजार ३७९ अ‌ॅक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे.

भारत कोरोना अपडेट
India Corona Update

By

Published : Jul 19, 2020, 11:36 AM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून गेल्या चोवीस तासात आत्तापर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. देशभरात गेल्या चोवीस तासांत ३८ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ५४३ जणांचा मृत्यू झाला.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १० लाख ७७ हजार ६१८ झाली असून यात ३ लाख ७३ हजार ३७९ अ‌ॅक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत संपूर्ण देशभरात ६ लाख ७७ हजार ४२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर, २६ हजार ८१६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details